konkandhara.com

  • Home
  • Uncategorized
  • महाडहून परतीच्या प्रवासासाठी १०० जादा एस.टी. बस; पनवेल मार्गावर ६० बसेस सज्ज
Image

महाडहून परतीच्या प्रवासासाठी १०० जादा एस.टी. बस; पनवेल मार्गावर ६० बसेस सज्ज

गणेशोत्सवानिमित्त मुंबई, पुणे, गुजरात अशा ठिकाणांहून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. आता दीड दिवस व पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन पार पडल्यामुळे परतीच्या प्रवासाची वेळ जवळ आली आहे. वाढत्या गर्दीला तोंड देण्यासाठी महाड आगार प्रशासनाने यंदाही विशेष तयारी केली आहे.

🟠 १०० जादा बसेस सज्ज

महाड आगार प्रमुख रितेश फुलपगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परतीच्या प्रवासासाठी १०० जादा एस.टी. बस धावणार आहेत. फक्त महाड–पनवेल मार्गावरच ५० ते ६० बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय मुंबई, पनवेल, नालासोपारा, परळ, ठाणे, बोरिवली, उरण, कल्याण, पुणे आदी ठिकाणांवर प्रवाशांसाठी थेट गाड्या सोडण्यात येणार आहेत.

🟠 प्रवाशांसाठी सुविधा

  • महाड आगार परिसरात तात्पुरते प्रवासी वाहतूक केंद्र उभारण्यात आले आहे.
  • येथे बुकींगनंतर बस सुटतील.
  • ग्रुप बुकींगची विशेष सुविधा असून अशा गट प्रवाशांसाठी एस.टी. बस थेट त्यांच्या गावातून सोडली जाणार आहे.
  • नुकतेच आगारात नवीन स्वच्छतागृह व शौचालय सुरू करण्यात आले असून प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा वाढवण्यात आल्या आहेत.

🟠 ग्रामीण फेर्‍यांवर परिणाम

मोठ्या प्रमाणात जादा गाड्या व चालक गुंतल्यामुळे ग्रामीण भागातील फेर्‍यांवर थोडा फरक पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी ग्रामीण प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

🟠 संपर्क क्रमांक

  • प्रवाशांनी बुकींग किंवा सोयीसाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:
  • रितेश फुलपगारे (आगार प्रमुख) – ७७२१०२९९३९
  • अमोल खाडे (सहाय्यक वाहतूक निरीक्षक) – ८७९३४६४७०२
  • उदय हाटे (स्थानक प्रमुख) – ९०२१०८४८९३
  • तुषार हाटे (निरीक्षक) – ७०५८७१६९१०
  • डावरे (कार्यशाळा प्रमुख) – ९४२३३८०५६८
  • चिनके (लिपिक) – ७७७००९९९३४

Releated Posts

मुंबई लोकल: सरकारचा ‘लक्झरी शो’ की लोकांसाठी खरंच दिलासा?

मुंबईच्या रेल्वे प्रवासाचं वास्तव म्हणजे — दररोज लाखो लोक गर्दीत कोंबले जातात, जीव धोक्यात घालून डब्यांमधून लटकतात, सुरक्षिततेचा…

ByByसितम्बर 5, 2025

सिंधुदुर्गात भाजप मंत्री नितेश राणे यांची थेट मटका बुकीवर धाड; 11 जण ताब्यात

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी आज थेट मटका बुकीवर छापा टाकत मोठी कारवाई केली.…

ByByअगस्त 21, 2025

‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक

कोकणात कामानिमित्त बाहेरगावी जाऊन पुन्हा गावी परतणाऱ्या नागरिकांना दीर्घकाळापासून ‘चाकरमानी’ म्हणून संबोधले जाते. मात्र हा शब्द आता कालबाह्य…

ByByअगस्त 21, 2025

फॅक्ट चेक | ने भारताने ‘ऑपरेशन सिंडूर’मध्ये 6 जेट्स आणि 250 सैनिक गमावले — सेनाध्यक्षांनी केला दावा? व्हायरल व्हिडीओ खोटा आहे

सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या व्हिडीओमध्ये भारताचे सेनाध्यक्ष जनरल उपेन्द्र द्विवेदी ‘ऑपरेशन सिंडूर’मध्ये 6 लढाऊ विमानं आणि 250 सैनिक…

ByByअगस्त 14, 2025
Image Not Found
Image Not Found

Gallery

H-1B व्हिसा फी वाढ: ट्रम्प यांचा राष्ट्रवादी मुखवटा आणि भारतासाठीचा कठोर इशारा
H-1B व्हिसा शुल्क वाढ: अमेरिकेचा निर्णय आणि भारतावरील परिणाम
ट्रम्प प्रशासनाचे धडक निर्णय — H-1B वीजावर $100,000 वार्षिक शुल्क; भारतासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात धक्का
जगदीप छोकर – लोकशाहीचा एक जागरूक प्रहरी
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचा आदर्श निर्णय – स्वतःची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल!
दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय: अडाणीविरोधातील गॅग ऑर्डर रद्द, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यास दिलासा
गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न
हे पुरुषा, बरं झालं तुला मोठे स्तन नाहीत!
आशिया कप भारत–पाक सामना : राज ठाकरेचं व्यंगचित्र आणि संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल