रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गाजलेल्या भक्ती मयेकर मृत्यू प्रकरणात नवं वळण आलं आहे. सायली बारमध्ये पोलिसांना मोबाईल फोन सापडला असून, तो मोबाईल मृत पावलेल्या भक्ती मयेकर यांचाच असल्याचं निष्पन्न झालं आहे.
मोबाईलमुळे तपासाला नवं बळ
या मोबाईलच्या तपासातून गुन्हेगारांची नवी नावं, पुरावे व संभाषणाचे रेकॉर्ड्स समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या मोबाईलचा तांत्रिक तपास सुरू केला असून सायबर सेलची मदत घेतली जात आहे.
जिल्ह्यात खळबळ
मोबाईल सापडल्यानंतर संपूर्ण रत्नागिरीत या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. मृत्यू प्रकरणात कोणाचा सहभाग आहे याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.