मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मराठी पत्रकार संघाकडून ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईत आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. राज्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणारा हा पुरस्कार राज्यातील कार्यक्षमता, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन प्रदान केला जातो.