नवी दिल्ली | देशात आज (मंगळवार) 15व्या उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडणार असून याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. म्हणजेच संध्याकाळपर्यंत देशाला नवा उपराष्ट्रपती कोण होणार हे स्पष्ट होईल.
पद रिक्त कसं झालं?
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंत राहणार होता. मात्र 21 जुलै रोजी त्यांनी आरोग्य कारणांमुळे राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले आणि नव्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली.
उमेदवार कोण?
या निवडणुकीत एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन मैदानात आहेत, तर विरोधी INDIA आघाडीकडून जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नंबर गेम कोणाच्या बाजूने?
एकूण 782 प्रतिनिधी मतदान करणार आहेत. त्यापैकी सुमारे 420 पेक्षा जास्त मते एनडीएच्या बाजूने असल्याचा अंदाज आहे, तर INDIA ब्लॉककडे जवळपास 312 मते आहेत. दरम्यान, काही पक्षांनी मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने 48 मते दोन्ही गटांना मिळणार नाहीत.
शर्यत रोचक का आहे?
बहुमत एनडीएकडे असलं तरी निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी यांच्या कार्यक्षेत्रात काही साम्य असलं, तरी अनेक मुद्द्यांवर दोघेही परस्परविरोधी आहेत. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय वर्तुळात वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे.