konkandhara.com

क्रिडा

भारतीय फिरकीपटू अमित मिश्रा निवृत्त; २५ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटभारतासाठी 22 कसोटी, 36 वनडे आणि 10 टी-20 सामने; आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळला शेवटचा सामना

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत २५ वर्षांच्या प्रवासाचा शेवट करत असल्याचं त्याने म्हटलं. मिश्रा भारतासाठी 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळला. कसोटीत 76, वनडेत 64 आणि टी-20 मध्ये 16 बळी घेतले. निवृत्तीची घोषणा करताना मिश्रा काय म्हणाला? “आज, 25 वर्षांनंतर, मी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. हा खेळ माझे पहिले प्रेम, माझा शिक्षक आणि आनंदाचा सर्वात मोठा स्रोत आहे. बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, प्रशिक्षक, सहकारी आणि चाहत्यांचे आभार. क्रिकेटने मला सर्व काही दिलं आणि आता या खेळाला काहीतरी परत देण्यास उत्सुक आहे.” — अमित मिश्रा अमित मिश्राची कारकीर्द पदार्पण: 2003 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत. कसोटी पदार्पण: 2008, मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध; पहिल्याच सामन्यात 5 बळी. विशेष कामगिरी: 2013 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेत 18 बळी, जवागल श्रीनाथच्या विक्रमाशी बरोबरी. टी-20 विश्वचषक 2014: 10 बळी घेत भारताला मदत. आयपीएल: अनेक संघांसाठी खेळला. शेवटचा सामना IPL 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध. मागील आठवड्यात तिनंनी निवृत्ती जाहीर केली 27 ऑगस्ट 2025 – रवीचंद्रन अश्विन, आयपीएलमधून निवृत्ती 2 सप्टेंबर 2025 – आसिफ अली, पाकिस्तानकडून सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती 4 सप्टेंबर 2025 – अमित मिश्रा, भारतीय क्रिकेटपटू (सर्व फॉरमॅट)

भारतीय फिरकीपटू अमित मिश्रा निवृत्त; २५ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटभारतासाठी 22 कसोटी, 36 वनडे आणि 10 टी-20 सामने; आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळला शेवटचा सामना Read More »

Hockey Asia Cup 2025: भारतानं दक्षिण कोरियाला 4-1 नं पराभूत करत चौथ्यांदा आशिया कप जिंकला

दिलप्रीत सिंहचा डबल स्ट्राईक; सुखजीत व अमित रोहिदासचे गोल; 2013 च्या फायनलमधील पराभवाचा बदला नवी दिल्ली | भारतीय हॉकी संघानं दमदार खेळ करत दक्षिण कोरियाला 4-1 नं पराभूत करत आशिया कपवर चौथ्यांदा कब्जा केला. भारतासाठी दिलप्रीत सिंहनं दोन गोल केले, तर सुखजीत सिंह आणि अमित रोहिदासनं प्रत्येकी एक गोल नोंदवला. या विजयासह भारतानं 2013 मध्ये कोरियाविरुद्ध झालेल्या फायनल पराभवाचा बदला घेतला आहे. सामना कसा रंगला? पहिला क्वार्टर: सुखजीत सिंहनं पहिला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, पण गोल करता आला नाही. दुसरा क्वार्टर: जुगराज सिंह 2 मिनिटांसाठी सस्पेंड झाला तरीही कोरिया गोल करू शकला नाही. दिलप्रीत सिंहनं दुसरा गोल करत भारताला 2-0 ची आघाडी दिली. हाफ-टाईम: भारत 2-0 ने आघाडीवर. तिसरा क्वार्टर: दिलप्रीत सिंहचा दुसरा गोल; भारत 3-0 वर. चौथा क्वार्टर: कोरियानं जोरदार प्रयत्न केले पण अमित रोहिदासनं भारताकडून चौथा गोल केला. अखेरीस सामना भारतानं 4-1 ने जिंकला. भारताचा बदला पूर्ण 2013 च्या आशिया कप फायनलमध्ये दक्षिण कोरियानं भारताला 4-3 ने पराभूत केलं होतं. तब्बल 12 वर्षांनी भारतानं त्या पराभवाचा बदला घेतला आणि कोरियाला 4-1 अशा फरकानं हरवलं.

Hockey Asia Cup 2025: भारतानं दक्षिण कोरियाला 4-1 नं पराभूत करत चौथ्यांदा आशिया कप जिंकला Read More »

IND vs PAK Head To Head Record In Asia Cup: आशिया कप टी-20 मध्ये भारत आघाडीवर, जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड

Asia Cup 2025 T20: भारत आणि पाकिस्तान ग्रुप स्टेजमध्ये 14 सप्टेंबरला आमनेसामने; फायनलपर्यंत तिनवेळा भिडण्याची शक्यता नवी दिल्ली | 2026 टी-20 वर्ल्डकपची पूर्वतयारी म्हणून आशिया कप 2025 टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातविरुद्ध होणार आहे. मात्र, चाहत्यांच्या नजरा 14 सप्टेंबरवर खिळल्या आहेत कारण त्या दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. आशिया कप टी-20 हेड-टू-हेड रेकॉर्ड भारत आणि पाकिस्तान आशिया कप टी-20 मध्ये आतापर्यंत 3 वेळा आमनेसामने आले आहेत. भारतानं 2 विजय मिळवले पाकिस्तानला 1 विजय मिळवता आला 👉 त्यामुळे आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये भारत 2-1 अशा आघाडीवर आहे. आशिया कप 2022 ग्रुप मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानला 5 विकेट्सनी हरवलं सुपर-4 मध्ये पाकिस्ताननं भारताला 5 विकेट्सनी पराभूत केलं फायनलमध्ये श्रीलंकेनं पाकिस्तानवर मात केली आशिया कप 2016 पहिल्यांदा टी-20 फॉरमॅटमध्ये आशिया कप झाला भारतानं पाकिस्तानला 5 विकेट्सनी हरवलं फायनलमध्ये भारतानं बांगलादेशवर 8 विकेट्सनी विजय मिळवला आशिया कप 2025: भारत-पाकिस्तान तिनवेळा भिडू शकतात 14 सप्टेंबर: ग्रुप स्टेज सामना 21 सप्टेंबर: सुपर-4 (दोन्ही संघ क्वालिफाय झाल्यास) 28 सप्टेंबर: फायनल (दोन्ही संघ पोहोचल्यास) भारतीय संघ (Asia Cup 2025) सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग. आशिया कप 2025 – वेळापत्रक (ग्रुप स्टेज) 9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग 10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई 11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग 12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान 13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका 14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान 15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान 15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग 16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान 17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई 18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान 19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान सुपर-4 सामने: 20 ते 26 सप्टेंबरफायनल सामना: 28 सप्टेंबर

IND vs PAK Head To Head Record In Asia Cup: आशिया कप टी-20 मध्ये भारत आघाडीवर, जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड Read More »

Asia Cup 2025: ड्रीम 11नं माघार घेतली; लीड स्पॉन्सरशिवाय उतरणार टीम इंडिया, बीसीसीआय नवा प्रायोजक शोधतंय

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ आशिया कप 2025 मध्ये लीड स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरणार आहे. ड्रीम 11नं बीसीसीआयसह केलेला करार संपवल्यानंतर ही परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवर लीड स्पॉन्सरचं नाव दिसणार नाही, हे सर्वप्रथम ऑलराऊंडर शिवम दुबे यानं शेअर केलेल्या नव्या किटच्या फोटोमधून स्पष्ट झालं. बीसीसीआयनं तत्काळ नव्या लीड स्पॉन्सरसाठी अर्ज मागवले आहेत. 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करावा लागेल, तर 16 सप्टेंबरला अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑनलाइन गेमिंग रेग्युलेशन बिल मंजूर केलं. या कायद्यामुळेच ड्रीम 11नं बीसीसीआयसह करार तोडला, अशी माहिती समोर आली आहे. बीसीसीआयनं पुढील तीन वर्षांसाठी लीड स्पॉन्सरशिपचे दर निश्चित केले आहेत — दोन देशांमधील सामन्यांसाठी साडेतीन कोटी आणि बहुराष्ट्रीय स्पर्धांसाठी दीड कोटी रुपये. बोर्डाला यामधून 400 कोटींच्या कमाईची अपेक्षा आहे. यापूर्वीही टीम इंडियाच्या जर्सीचे प्रायोजक वारंवार बदलले आहेत. सहारा, स्टार, ओप्पो, बायजू आणि ड्रीम 11 या कंपन्या विविध कारणांमुळे करार संपवून निघून गेल्या आहेत. त्यामुळे बीसीसीआय आता अधिक स्थिर आणि दीर्घकालीन स्पॉन्सरशिपसाठी प्रयत्नशील आहे.

Asia Cup 2025: ड्रीम 11नं माघार घेतली; लीड स्पॉन्सरशिवाय उतरणार टीम इंडिया, बीसीसीआय नवा प्रायोजक शोधतंय Read More »