konkandhara.com

राजकारण

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत गैरव्यवहार उघड – राज्यभरात 26.30 लाख महिलांची घराघरांतून पडताळणीअपात्र लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी अंगणवाडी सेविका तैनात; शहरी भागात अपूर्ण पत्त्यांमुळे पडताळणीला अडथळे

मुंबई – मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ (Majhi Ladki Bahin Yojana) योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहारानंतर राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. एकूण 26.30 लाख महिला लाभार्थ्यांची घराघरांत जाऊन पडताळणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कामाची जबाबदारी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे. काय आढळलं प्राथमिक तपासणीत? माहिती तंत्रज्ञान विभागाने केलेल्या प्राथमिक विश्लेषणात अनेक अनियमितता उघडकीस आल्या. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी नोंदणी केली वयोमर्यादेचे उल्लंघन काही पुरुषांनी खोट्या पद्धतीने लाभ घेतला या प्रकारांमुळे राज्य सरकारने व्यापक तपासणीचा निर्णय घेतला आहे. पडताळणीत मोठ्या अडचणी पडताळणी मोहिमेत सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, विशेषतः शहरी भागात. सरकारकडून मिळालेल्या यादीत केवळ शहर आणि जिल्ह्याचे नाव असून, संपूर्ण पत्ते नाहीत अनेक पत्त्यांवर घरमालक उपलब्ध नाहीत काही पत्ते चुकीचे निघत आहेत या कारणामुळे पडताळणीची प्रक्रिया विलंबात अडकली असून, दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही काम अपूर्ण आहे. तपासणीचे मुख्य निकष विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, पडताळणी पुढील महत्त्वाच्या निकषांवर केली जात आहे: लाभार्थीचे वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असणे आवश्यक एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिलांना लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का याची चौकशी लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी नाही ना याची खात्री पडताळणी पथके प्रत्येक घरात जाऊन वैवाहिक स्थिती, रोजगार तपशील आणि कुटुंब रचनेची माहिती गोळा करत आहेत. आढळत आहेत नियमबाह्य गोष्टी या पडताळणीतून आतापर्यंत अनेक नियमबाह्य प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे खऱ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा फायदा पोहोचवण्याची प्रक्रिया अधिक काटेकोर केली जात आहे.

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत गैरव्यवहार उघड – राज्यभरात 26.30 लाख महिलांची घराघरांतून पडताळणीअपात्र लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी अंगणवाडी सेविका तैनात; शहरी भागात अपूर्ण पत्त्यांमुळे पडताळणीला अडथळे Read More »

Rohit Pawar News: देवेंद्र फडणवीसांच्या ‘देवाभाऊ’ जाहिरातीवरून रोहित पवारांचा टोला”सरकारकडे योजना बंद करण्याइतके पैसे नाहीत, मग कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या?” – रोहित पवार

मुंबई | गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देवाभाऊ’ शीर्षकाची जाहिरात झळकली. काही ठिकाणी फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी पुष्प अर्पण करताना दिसत होते, तर काही ठिकाणी ते गणपती बाप्पाला वंदन करताना दाखवले गेले. या जाहिरातींवर प्रकाशकाचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि सरकारवर जोरदार टीका केली. नेमकं काय म्हणाले रोहित पवार? “तुम्ही 40 कोटी, 400 कोटी किंवा 4000 कोटींच्या जाहिराती दिल्या तरी आम्हाला हरकत नाही. पण या निनावी जाहिराती नेमक्या का दिल्या गेल्या? याबाबत आमचा आक्षेप आहे,” असे रोहित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, “जर या जाहिराती सरकारने दिल्या असतील, तर एका बाजूला पैसे नसल्याचे कारण देऊन योजना बंद केल्या जात आहेत, कंत्राटदारांची बिले प्रलंबित आहेत आणि काहीजण आत्महत्या करत आहेत. अशा वेळी कोट्यवधींच्या जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?” “90 कोटींचा दंड माफ केलेल्या कंपनीने जाहिरात दिली का?” रोहित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “भाजपने जाहिरात दिली असेल तर नावाने का दिली नाही? नाही दिली, तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षातील अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून दिली का? उदाहरण द्यायचं झालं तर, ज्या कंपनीचा 90 कोटी रुपयांचा दंड महसूलमंत्री म्हणून तुम्ही माफ केला होता, त्या कंपनीने या जाहिराती दिल्या का?” याशिवाय, “जर या जाहिरातींमध्ये काहीही काळेबेरं नसेल, तर एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून जाहिराती कुणी दिल्या हे जाहीर करा,” असे आव्हानही पवारांनी दिले.

Rohit Pawar News: देवेंद्र फडणवीसांच्या ‘देवाभाऊ’ जाहिरातीवरून रोहित पवारांचा टोला”सरकारकडे योजना बंद करण्याइतके पैसे नाहीत, मग कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या?” – रोहित पवार Read More »

धाराशिव | गणेशोत्सवात पेटला जुना वैर! निंबाळकर विरुद्ध पाटील संघर्ष पुन्हा रंगमंचावर

गणरायाला निरोप देतानाही धाराशिवमध्ये राजकारणाचा ज्वालामुखी फूटला. विसर्जनाच्या मिरवणुकीत पुन्हा एकदा समोरासमोर आले – खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार पुत्र मल्हार पाटील. जिल्ह्यातील जुना वैर असलेला निंबाळकर विरुद्ध पाटील संघर्ष आता नव्या पिढीत अधिक पेटताना दिसतोय. तीन पिढ्यांचा वैर धाराशिवचं राजकारण म्हणजे एक घराणं, दोन परंपरा आणि एक दीर्घकाळ धगधगत असलेला संघर्ष. पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर – हे चुलत भाऊ पण राजकारणात कट्टर प्रतिस्पर्धी. 2006 मध्ये पवनराजेंची हत्या झाली आणि त्या प्रकरणात पद्मसिंह पाटलांवर आरोप झाले. त्यानंतर दोन्ही घराण्यातील वैर अधिकच गहिरं झालं. राजकारणाचा रणांगण पित्याच्या निधनानंतर ओमराजे राजकारणात आले आणि 2009 पासून त्यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांना थेट टक्कर दिली. त्यानंतर जिल्ह्यात राजकारण दोन गटात विभागलं – निंबाळकर गट विरुद्ध पाटील गट. प्रशासनापासून निवडणुकांपर्यंत या संघर्षाचा प्रभाव स्पष्ट दिसतो. पुढच्या पिढीतला संघर्ष गेल्या काही वर्षांत या संघर्षात उतरलेत पाटील कुटुंबाची पुढची पिढी – मल्हार पाटील. वडिलांवर ओमराजेंनी टीका केली तेव्हा मल्हारांनी थेट पलटवार करत त्यांची ‘औकात’ काढली. प्रत्युत्तरादाखल ओमराजेंनीही थेट इशारा दिला – “राजकारणामुळे माझ्या वडिलांना संपवलं. आता तुमचं राजकारण संपवणार!” निवडणुकीतून मिरवणुकीत अलीकडच्या लोकसभा निवडणुकीतही हा वैर रंगला – मल्हार पाटलांच्या आई राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या होत्या तर त्यांच्या समोर होते ओमराजे निंबाळकर. आता गणेश विसर्जन मिरवणुकीत दोघे पुन्हा समोरासमोर आले आणि धाराशिवकरांनी जुना ‘कलगीतुरा’ प्रत्यक्ष अनुभवला. जनता मात्र हवालदिल या सततच्या संघर्षात जिल्ह्याचा विकास मात्र मागे पडला आहे. राजकीय, कौटुंबिक वैर बाजूला ठेवून एकत्रित काम करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. “तुमचं भांडण बाजूला ठेवा, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सुबुद्धी दे बाप्पा!” अशीच धाराशिवकरांची मनापासून प्रार्थना आहे.

धाराशिव | गणेशोत्सवात पेटला जुना वैर! निंबाळकर विरुद्ध पाटील संघर्ष पुन्हा रंगमंचावर Read More »

अदाणी एंटरप्रायजेसला दिलासा; दिल्ली न्यायालयाने पत्रकार-एनजीओंना बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेशपडताळणी न केलेला मजकूर प्रकाशित करण्यास मज्जाव; पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला

नवी दिल्ली – अदाणी समूहाच्या अदाणी एंटरप्रायजेस लिमिटेड (AEL) कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली न्यायालयाने काही पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय एनजीओंना (NGOs) कंपनीविरुद्ध बदनामीकारक आणि पडताळणी न केलेला मजकूर प्रकाशित करण्यास रोखले आहे. तसेच विद्यमान लेख, सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओमधील वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. काय आहे प्रकरण? अदाणी एंटरप्रायजेसने दाखल केलेल्या दाव्यानुसार, काही विशिष्ट वेबसाइट्स व व्यक्तींच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात नकारात्मक आणि हेतुपुरस्सर मजकूर प्रसारित केला जात होता. यात ‘paranjoy.in’, ‘adaniwatch.org’ आणि ‘adanifiles.com.au’ या संकेतस्थळांचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या मजकुराचा उद्देश त्यांच्या जागतिक स्तरावरील प्रतिमेला धक्का पोहोचवणे आणि व्यवसायिक कामकाजात अडथळे आणणे हा होता. या प्रकरणातील प्रतिवादींमध्ये परंजय गुहा ठाकुर्ता, रवी नायर, अबीर दासगुप्ता, अयस्कंता दास, आयुष जोशी, बॉब ब्राउन फाउंडेशन, ड्रीमस्केप नेटवर्क इंटरनॅशनल प्रा. लि., गेटअप लि., डोमेन डायरेक्टर्स प्रा. लि. (इन्स्ट्रा) आणि जॉन डो यांचा समावेश आहे. न्यायालयाचे निरीक्षण वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश अनुज कुमार सिंह यांनी सुनावणीदरम्यान निरीक्षण नोंदवले की : “अदाणी एंटरप्रायजेसच्या बाजूने प्रकरण प्रथमदर्शनी योग्य दिसते. सततचा बदनामीकारक मजकूर, रिट्विट आणि ट्रोलिंगमुळे त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेवर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि मीडिया ट्रायलला बळी पडावे लागू शकते.” न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत प्रतिवादींना पडताळणी न केलेला व बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून रोखले आहे. तसेच, ५ दिवसांच्या आत सोशल मीडिया पोस्ट्स व लेखांमधून वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. जर मजकूर हटवणे शक्य नसेल, तर संपूर्ण पोस्ट/लेख हटवावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. टेक कंपन्यांनाही आदेश जर प्रतिवादींनी आदेशाचे पालन केले नाही, तर गूगल, युट्यूब, आणि एक्स (माजी ट्विटर) यांसारख्या मध्यस्थांना (Intermediaries) ३६ तासांच्या आत मजकूर हटवणे किंवा वापर थांबवणे बंधनकारक असेल, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

अदाणी एंटरप्रायजेसला दिलासा; दिल्ली न्यायालयाने पत्रकार-एनजीओंना बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेशपडताळणी न केलेला मजकूर प्रकाशित करण्यास मज्जाव; पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला Read More »

बीड शहर पहिल्यांदाच रेल्वे नकाशावर; १७ सप्टेंबरला धावणार पहिली रेल्वेमराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ऐतिहासिक क्षण; उपमुख्यमंत्री अजित पवार करतील उद्घाटन

बीड – बीडकरांचे दशकांपासूनचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. बीड–अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून, येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पहिल्यांदाच रेल्वे बीड जिल्ह्यातून धावणार आहे. या निमित्तानं बीड शहर प्रथमच रेल्वेच्या नकाशावर झळकणार असून, जिल्ह्याच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे. रेल्वेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. उद्घाटनाच्या तयारीसाठी बीड रेल्वे स्टेशनवर कामाला वेग आला असून, प्लॅटफॉर्मपासून विद्युतीकरणापर्यंत सर्व कामं अंतिम टप्प्यात आहेत. बीडकरांचं स्वप्न अखेर साकार गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात रेल्वेची मागणी होत होती. शहरात रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवास, व्यापार आणि उद्योगक्षेत्रावर त्याचा परिणाम होत होता. आता या मार्गामुळे बीडकरांना थेट रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. उद्घाटनाची उत्सुकता शिगेला बीड शहरात उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे. स्थानिक पातळीवर रेल्वे धावणार या ऐतिहासिक क्षणाचं स्वागत करण्यासाठी नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटना सज्ज होत आहेत. “बीड जिल्ह्यासाठी १७ सप्टेंबर हा केवळ मराठवाडा मुक्ती संग्राम दिन राहणार नाही, तर बीडकरांच्या आयुष्यात रेल्वेचं नवं पर्व सुरू होणार आहे. दशकानुदशकांचं स्वप्न अखेर पूर्ण होतंय,” असं स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं.

बीड शहर पहिल्यांदाच रेल्वे नकाशावर; १७ सप्टेंबरला धावणार पहिली रेल्वेमराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ऐतिहासिक क्षण; उपमुख्यमंत्री अजित पवार करतील उद्घाटन Read More »

याला तणाव नाही, दादागिरी म्हणतात” – अजित पवार प्रकरणावर संजय राऊतांचा हल्लाबोलIPS अंजना कृष्णा प्रकरणावरून संजय राऊतांचे सरकारवर निशाणा – “90% मंत्रिमंडळ नैतिकतेवर टिकणार नाही”

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांच्यातील वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “याला तणाव म्हणत नाहीत, दादागिरी म्हणतात,” असा टोला राऊतांनी लगावला. बेकायदेशीर काम करणाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन करणं म्हणजे ते त्यांच्या जवळचेच लोक असल्याचा आरोपही त्यांनी केला. बेकायदेशीर कामांना संरक्षण देण्याचा प्रयत्न? संजय राऊत म्हणाले, “बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला. याचा अर्थ ते त्यांचीच माणसं होती. पोलिसांना कारवाई थांबवायला सांगणं म्हणजे नियमांबाहेरचं काम. याला तणाव नाही, दादागिरी म्हणतात.” राऊतांनी अजित पवारांच्या भाषणातील मुद्दाही आठवला. “अजित पवार नेहमी म्हणतात मी नियमबाह्य काही करत नाही. मग या घटनेत पोलिसांना बेकायदेशीर कामांना संरक्षण का द्यावं लागलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं? या प्रकरणात IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना लक्ष्य करणाऱ्या आमदारांच्या पत्रावरही राऊतांनी टीका केली. “त्या महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं? नियम आणि कायदा सांगणं हेच त्यांचं काम आहे. उपमुख्यमंत्र्यांना कायद्याचं भान करून दिलं म्हणून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जातेय. हे दुर्दैवी आहे.” “90% मंत्रिमंडळ खाली जाईल” संजय राऊतांनी सरकारवर मोठा घणाघात करताना म्हटलं – “नैतिकतेवर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील 90% मंत्रिमंडळ घरी जाईल. शिंदे गटाचे सर्व मंत्री पदावर राहणार नाहीत. अजित पवारांचे मंत्रीसुद्धा टिकणार नाहीत. प्रत्येकावर आरोप आहेत, प्रत्येक जण बेकायदेशीर कामांत गुंतलेला आहे.”

याला तणाव नाही, दादागिरी म्हणतात” – अजित पवार प्रकरणावर संजय राऊतांचा हल्लाबोलIPS अंजना कृष्णा प्रकरणावरून संजय राऊतांचे सरकारवर निशाणा – “90% मंत्रिमंडळ नैतिकतेवर टिकणार नाही” Read More »

दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धवांसोबत राज ठाकरे येण्याची शक्यता“मुंबईत मराठी माणूस टिकवण्यासाठी उद्धव-राज यांचे मिलन गरजेचे” – सचिन अहिर

मुंबई – येत्या दसरा मेळाव्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले आहेत. यंदाच्या शिवतीर्थावरील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे हेदेखील स्टेजवर दिसू शकतात. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण इशारा दिला. “दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते,” असे सचिन अहिर म्हणाले. “दसरा मेळावा – न भूतो न भविष्यती” सचिन अहिर यांनी एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत सांगितले – “उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे ही फक्त दोन पक्षांची गरज नाही, तर राज्यासाठी आवश्यक आहे. दसऱ्याला कार्यकर्त्यांना दिशा देण्याचं काम होतं. यावेळचा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ स्वरुपाचा असेल.” त्यांनी पुढे सांगितले की, राज आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांकडे कायम पाहत असतात. दोघं स्टेजवर एकत्र दिसतील का, हे सांगता येणार नाही. मात्र त्यांना आमंत्रित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महानगरपालिकेची लढाई आणि मराठी माणसाचा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा उल्लेख करताना सचिन अहिर म्हणाले – “मुंबईची भौगोलिक परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असेल. मी काँग्रेस-राष्ट्रवादीत 15 वर्ष होतो, पण महानगरपालिका उत्तम चालवू शकणारा पक्ष फक्त शिवसेना आहे, असं आम्हाला नेहमी वाटलं.” त्यांनी पुढे भर दिला – “मुंबईत मराठी माणूस टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र नेतृत्व करणे ही काळाची गरज आहे.”

दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धवांसोबत राज ठाकरे येण्याची शक्यता“मुंबईत मराठी माणूस टिकवण्यासाठी उद्धव-राज यांचे मिलन गरजेचे” – सचिन अहिर Read More »

अजित पवार – महिला IPS वाद प्रकरणात अमोल मिटकरींचा यूटर्न“माझी वैयक्तिक भूमिका होती, पक्षाची नव्हती; पोलिस दलाबद्दल सर्वोच्च आदर” – अमोल मिटकरी

सोलापूर – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांच्या व्हिडीओ कॉलमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या वादावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आता माघार घेतली आहे. अंजना कृष्णा यांच्या नेमणुकीबाबत UPSC चौकशीची मागणी करणारे पत्र लिहिल्यानंतर मिटकरींनी सोशल मीडियावर दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरी व्यक्त करत घेतला यूटर्न अमोल मिटकरींनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं – “सोलापुर घटनेसंदर्भात केलेला ट्वीट मी बिनशर्थ मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती तर वैयक्तिक भूमिका होती. आपले पोलिस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्ण सहमत आहे.” चौकशीची मागणी, नंतर माघार शुक्रवारी मिटकरींनी UPSC ला पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली होती. “पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणेच अंजना कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेत घोळ झाला असावा,” असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. मात्र राज्यभर निर्माण झालेल्या चर्चेनंतर मिटकरींनी आज आपली भूमिका मागे घेतली. नेमकं प्रकरण काय? माढा तालुक्यातील कुर्डू गावात मुरुम उत्खनन थांबवण्यासाठी अंजना कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यादरम्यान गावकऱ्यांशी वाद झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावला.व्हिडीओत अजित पवार स्वतःचा परिचय देत “डीसीएम अजित पवार बोल रहा हूं… कार्यवाही बंद करो” असे सांगताना दिसतात. त्यावर कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही. पवार रागावत “इतनी डेरिंग है तुम्हारी… मेरा चेहरा तो पहचानोगा ना” असे म्हणत व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसले.

अजित पवार – महिला IPS वाद प्रकरणात अमोल मिटकरींचा यूटर्न“माझी वैयक्तिक भूमिका होती, पक्षाची नव्हती; पोलिस दलाबद्दल सर्वोच्च आदर” – अमोल मिटकरी Read More »

बारामतीत ओबीसींचं ठिय्या आंदोलन; मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी“फडणवीसांना पुरंदरमध्ये घेराव घालणार” – ओबीसी समाजाचा इशारा

बारामती – बारामतीत काल ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा पार पडल्यानंतर आज त्याच ठिकाणी ओबीसी समाजाकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जर प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुरंदरमध्ये घेराव घालून जाब विचारला जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. जरांगे यांच्या वक्तव्याविरोधात संताप मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणादरम्यान धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांचे कार्यकर्ते देखील अपमानास्पद वक्तव्य करत असल्याचं सांगितलं जातं. “मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचे व्हिडिओ आम्ही प्रशासनाला दिले आहेत. तरीदेखील कारवाई होत नाही. 1 तारखेपासून आम्ही मागणी करत आहोत, 5 तारखेला भव्य मोर्चा काढला. पण सरकार गुन्हा दाखल करत नाही. नेमका कोणत्या दबावामुळे हा विलंब होतोय, हे समजत नाही,” असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. पुरंदरमध्ये फडणवीसांना जाब विचारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उमाजी नाईक जयंतीनिमित्त पुरंदरला येणार आहेत. त्यावेळी त्यांना जाब विचारण्याची तयारी ओबीसी समाजाने केली आहे. “तुम्ही आमच्या राजाजवळ नतमस्तक होता, पण दुसरीकडे आमच्यावर अन्याय होत आहे. आमचं सरकार असतानाही मनोज जरांगे यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना थेट विचारणार आहोत,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. बारामती व परिसरात ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येत असून, आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते.

बारामतीत ओबीसींचं ठिय्या आंदोलन; मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी“फडणवीसांना पुरंदरमध्ये घेराव घालणार” – ओबीसी समाजाचा इशारा Read More »

मराठा आरक्षणानंतर भाजपची ‘देवाभाऊ’ बॅनरबाजी; शिंदेंची प्रतिक्रियामुंबई-ठाण्यात फडणवीसांचे पोस्टर झळकले; “श्रेयवादाच्या लढाईत नाही” – मुख्यमंत्री

मुंबई/ठाणे – राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा पुढे करण्याची मोहीम सुरू झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात ‘देवाभाऊ’ असा उल्लेख असलेले बॅनर झळकले आहेत. त्याचबरोबर प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरही अशाच जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. सरकारने मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत जीआर काढले होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपसमितीने घेतलेल्या निर्णयानंतर जरांगे यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. यानंतर लगेचच भाजपकडून ‘देवाभाऊ’ मोहिम पुढे आल्याचं स्पष्ट होत आहे. या बॅनरवर “कोणीही निंदा करो, कितीही टीका करो, तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस एकच – देवेंद्रजी फडणवीस” असं लिहिलं आहे. तसेच “छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार, ना जातीचा, ना पातीचा, ना भाषेचा – देवाभाऊ” असाही मजकूर देण्यात आला आहे. मात्र हे पोस्टर नेमके कुणी लावले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीदेखील ही बॅनरबाजी भाजपकडूनच राबवली गेल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं – “श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही. मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकारने एकत्रितपणे केलं आहे. देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून पुढे काम करणार आहोत. सर्वसामान्यांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.” राजकीय वर्तुळात या हालचालींना आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्व दिलं जात आहे.

मराठा आरक्षणानंतर भाजपची ‘देवाभाऊ’ बॅनरबाजी; शिंदेंची प्रतिक्रियामुंबई-ठाण्यात फडणवीसांचे पोस्टर झळकले; “श्रेयवादाच्या लढाईत नाही” – मुख्यमंत्री Read More »