konkandhara.com

महाराष्ट्र

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचा आदर्श निर्णय – स्वतःची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल!

नंदुरबार | शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक संदेश देणारा आणि पालकांना प्रेरणा देणारा आदर्श निर्णय जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी घेतला आहे. त्यांनी स्वतःच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या (ZP) शाळेत दाखल करून ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता आणि विश्वासार्हतेबाबतचा ठाम संदेश दिला आहे. सामान्यतः अधिकारी वर्ग व नागरी समाजातील अनेक पालक आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यास प्राधान्य देतात. मात्र, जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी स्वतःच्या वर्तनातून ‘ZP शाळा केवळ गरजूंसाठी नाहीत, तर सक्षम व दर्जेदार शिक्षण देऊ शकतात’ हे दाखवून दिले आहे. त्यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून, सरकारी शाळांकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा मिळत आहे.

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचा आदर्श निर्णय – स्वतःची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल! Read More »

गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून तब्बल ५ लाख ९६ हजारांहून अधिक प्रवाशांनी एसटीद्वारे सुखरूप प्रवास केला. या विशेष सेवेतून एसटीला २३ कोटी ७७ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी ५ हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेसनी १५,३८८ फेऱ्या पूर्ण केल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “गणेशोत्सवासाठी आप-आपल्या गावी पोहोचलेल्या लाखो कोकणवासीयांचा सुखरूप प्रवास शक्य करून दाखवणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि मार्गदर्शन करणारे अधिकारी खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत.” एसटी महामंडळाने या प्रवाशांची अपघात विरहित सुरक्षित वाहतूक करून नवा इतिहास रचला आहे.

गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न Read More »

मुंबईतील पागडी प्रणालीतील जिर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी आमदार अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांची mhadaofficial अधिकाऱ्यांसोबत बैठक

मुंबईतील पागडी प्रणाली अंतर्गत येणाऱ्या धोकादायक व जिर्ण इमारतींच्या पुनर्विकास या गंभीर प्रश्नावर आमदार अनिल परब, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि पागडी एकता संघ पदाधिकाऱ्यांनी एमएचएडीएचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुभाष जाधव (IAS) यांची भेट घेतली. सध्या मुंबईत जवळपास 13,800 हून अधिक इमारतींमध्ये सुमारे 10 लाख कुटुंबं गेली 70 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या इमारतींपैकी बहुतांश इमारती जिर्णावस्थेत असून राहण्यासाठी धोकादायक ठरल्या आहेत. मविआ सरकारच्या काळात भाडेकरूंना पुनर्विकासाचा अधिकार देण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आले होते. म्हणजेच, जर मालकाने पुनर्विकासास नकार दिला, तरीही भाडेकरूंना तो करण्याचा अधिकार मिळणार होता. मात्र, सध्या ‘कायदेशीररित्या सक्षम प्राधिकरण/संस्था कोण?’ या कारणावरून ही अंमलबजावणी थांबविण्यात आली आहे. आजच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या मागण्या पुढे मांडल्या गेल्या: या मागण्यांवर चर्चा करताना मान्यवरांनी तातडीच्या उपाययोजनांवर भर दिला. मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या राहणीमानासाठी पुनर्विकासाची प्रक्रिया लवकर सुरू व्हावी, हीच वेळेची गरज असल्याचं एकमत बैठकीत व्यक्त झालं.

मुंबईतील पागडी प्रणालीतील जिर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी आमदार अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांची mhadaofficial अधिकाऱ्यांसोबत बैठक Read More »

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. याबाबत पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राज्य सरकारतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचं वैशिष्ट्यमैसूरच्या शाही दसऱ्याप्रमाणेच कोल्हापूरचा शाही दसरा हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. संस्थानकाळापासून चालत आलेल्या या परंपरेत राजेशाही थाट कमी झाला असला तरी उत्साह आणि परंपरा आजही तितक्याच जोमात टिकून आहेत. जुना राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर निघणारा छबिना, त्यातील लवाजमा आणि करवीरकरांची प्रचंड गर्दी हे या सोहळ्याचे खास आकर्षण आहे. पूर्वी हा सोहळा टेंबलाईवाडीच्या माळावर साजरा होत असे. नंतर तो दसरा चौकात होऊ लागला. शाहू महाराजांच्या काळात हा चौक गावाबाहेर होता. भवानी मंडपातून निघणारा लवाजमा, मार्गावरील प्रचंड गर्दी आणि दसरा चौकातील सोने लुटण्याचा सोहळा यामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला. राजेशाही परंपरेचं आजही पालनआजही दसऱ्याच्या आधीपासूनच दसरा चौकात शाही थाटाची तयारी सुरू होते. लाल-पांढरे शामियाने, जरी पटका, दगडी कमान, पानांची सजावट आणि सोने लुटण्याची खास व्यवस्था अशा परंपरांनी हा सोहळा अधिकच भव्य बनतो. सीमोल्लंघनाचा हा सोहळा दरवर्षी कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवतो.

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा Read More »

महाराष्ट्राची गंगा एस. कदम भारतीय महिला अंध क्रिकेट संघाची उपकर्णधार निवडली

भारतीय महिला अंध क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी महाराष्ट्रातील गंगा एस. कदम यांची निवड झाली आहे. त्यांच्या या ऐतिहासिक निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. येत्या ११ ते २५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भारतात होणाऱ्या पहिल्या महिला अंध क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गंगा एस. कदम भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघ, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI) आणि समर्थनम ट्रस्ट यांना देखील शुभेच्छा देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, ही स्पर्धा भारतीय महिला अंध क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरेल आणि भारतीय महिला संघ निश्चितपणे आपली छाप सोडेल असा विश्वास संघीय कार्यकर्ते व क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्राची गंगा एस. कदम भारतीय महिला अंध क्रिकेट संघाची उपकर्णधार निवडली Read More »

रत्नागिरीत बांबू परिषद आणि शेतकरी मेळावा; १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प

रत्नागिरी | आज रत्नागिरीतील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात बांबू परिषद व शेतकरी मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. या वेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, “बांबू ही फक्त एक पिकाची संकल्पना नसून, उत्पन्न वाढवण्याचा आणि नवे उद्योग निर्माण करण्याचा क्रांतिकारी मार्ग आहे.” 👉 येत्या १७ सप्टेंबरला राज्य सरकार महाराष्ट्राची पहिली बांबू पॉलिसी जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.👉 योग्य नियोजन व शेतकऱ्यांच्या सहभागाने बांबू लागवडीतून प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा ₹३०,००० ते ₹४०,००० अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.👉 रत्नागिरी जिल्ह्यात किमान १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.👉 बांबूपासून फर्निचर, ज्वेलरी, कापड, शूज, मेथेनॉल अशा विविध उद्योगांना चालना मिळू शकते.👉 विमानतळ टर्मिनल बिल्डिंगमधील ५०% फर्निचर बांबूपासून तयार करण्यात येणार आहे, हे कोकणासाठी अभिमानाचे पाऊल असल्याचेही सामंत यांनी सांगितले. “ही परिषद फक्त चर्चा नसून, शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवा आर्थिक आधार देणारी चळवळ आहे. रत्नागिरी महाराष्ट्रातील सर्वात मोठा बांबू लागवड करणारा जिल्हा बनणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी मंडळाध्यक्ष पाशाभाई पटेल, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.

रत्नागिरीत बांबू परिषद आणि शेतकरी मेळावा; १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी मदत ट्रक रवाना

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्रातून मोठी पुढाकार घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून भाजपा महाराष्ट्र प्रदेशतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला झेंडा दाखवून रवाना केले. पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडे आणि आवश्यक सामग्री असलेला हा मदत ट्रक जम्मू-काश्मीरकडे रवाना झाला असून, यामुळे तेथील पुनर्वसन प्रक्रियेला मोठा हातभार लागणार आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी मदत ट्रक रवाना Read More »

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित; 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1892 कोटी जमा

मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित करण्यात आला. या अंतर्गत 91 लाख 65 हजार 156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1892.61 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेल्या या निर्णयासोबतच मंत्रिमंडळ बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 🟢 शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत उपसा जलसिंचन योजनांना पुढील दोन वर्षांसाठी वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वीजदर सवलत योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. 🟢 पायाभूत सुविधा विकासासाठी कर्ज नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेत हुडकोकडून दोन हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. यामधून छत्रपती संभाजीनगरला 822 कोटी, नागपूरला 268 कोटी, तर मीरा-भाईंदरला 116 कोटींचा निधी मिळणार आहे. 🟢 लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी घोंगासाठी 4 कोटी 76 लाख, तर कानडीसाठी 4 कोटी 92 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 🟢 इंटेलिजन्स ब्युरोसाठी जमीन केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोला आसुडगाव–पनवेल येथील जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित; 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1892 कोटी जमा Read More »

रायगडमध्ये आदिवासी घरकुल योजनेसाठी बैठक; तळा-म्हसळा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मिळणार घरांचा लाभ

रायगड | रायगड जिल्ह्यातील तळा व म्हसळा तालुक्यातील गावांना आदिवासी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्राचे माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यातील सर्व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. चर्चेअंती संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंत्री अशोक उईके यांनी स्पष्ट केले की, पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार आहे.

रायगडमध्ये आदिवासी घरकुल योजनेसाठी बैठक; तळा-म्हसळा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मिळणार घरांचा लाभ Read More »

मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक; बेटी बचाओ अभियानासह अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा

मुंबई | महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कुटुंब सल्ला केंद्रांचे प्रलंबित प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा आढावा, चेंबूर येथील अहिल्या भवन, दि चिल्ड्रेन एड सोसायटी, तसेच राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य निवडी संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानावर भर बैठकीत सांगण्यात आले की या अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिरे, पथनाट्य, मुलींच्या जन्माचे स्वागत अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. हे उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रभावीपणे राबवावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कुटुंब सल्ला केंद्रांचे वन स्टॉप सेंटरमध्ये विलिनीकरण सध्या कार्यरत असलेली ४४ कुटुंब सल्ला केंद्रे ही वन स्टॉप सेंटरमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर केंद्रातील केस वर्कर आणि समुपदेशकांना वन स्टॉप सेंटरमध्येच समुपदेशक पदावर नियुक्त करण्याची सूचना देण्यात आली. संस्थांना निधी आणि पदभरतीची गरज विभागाच्या विविध योजना ७९ संस्थांमार्फत राबवल्या जात असून या संस्थांना आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदभरती करावी, असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले. चेंबूर येथील अहिल्या भवनावर तातडीची कार्यवाही बैठकीत चेंबूर येथील अहिल्या भवनाच्या उभारणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. अधिकारी उपस्थित या बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त श्रीमती नयना गुंडे, सहसचिव वि.रा. ठाकूर, सहआयुक्त राहुल मोरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक; बेटी बचाओ अभियानासह अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा Read More »