konkandhara.com

मराठवाडा

संजय राऊतांचा कृपाल तुमाने यांच्यावर पलटवार : “तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा”शिवसेना आमदारांचे पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने; संजय राऊत म्हणाले – “शिवसेना निष्ठावंतांची आहे

मुंबई | शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी दावा केला होता की उद्धव ठाकरे यांचे दोन आमदार सोडले तर सर्व आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत आणि दसऱ्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होईल. या विधानावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार पलटवार करत तुमाने यांना खोचक टोला लगावला आहे. राऊतांचा हल्लाबोल संजय राऊत म्हणाले,“हे कोण बोलतंय? ज्यांचा आम्ही लोकसभेला दारूण पराभव केला. तुम्ही या लोकांना का महत्व देता? ही त्यांची निराशा आहे. आज शिवसेनेत जे आमदार, खासदार आहेत ते शुद्ध आणि निष्ठावंत आहेत. जे पैशाला विकले, ईडी-सीबीआयच्या धमक्यांना घाबरून गेले ते गेले. आता उरलेले हे खरी शिवसेना आहे. त्यांच्यावर बोलणं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आहे.” “तुमचं नशीब फुटलंय” राऊत पुढे म्हणाले की,“ज्यांनी हे भाष्य केले ते पूर्वी शिवसेनेचे खासदार होते. आमच्याकडून निवडून आल्यानंतर त्यांचा स्वतःच्या मतदारसंघात पराभव झाला. मग त्यांना मागच्या दाराने विधान परिषदेत आणलं. आता ते शिवसेना फुटणार असल्याचं सांगत आहेत. तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा.” राऊत यांनी असंही म्हटलं की भविष्यात शिंदे गटाचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार आहे आणि त्याबाबत चर्चा सुरू आहे.

संजय राऊतांचा कृपाल तुमाने यांच्यावर पलटवार : “तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा”शिवसेना आमदारांचे पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने; संजय राऊत म्हणाले – “शिवसेना निष्ठावंतांची आहे Read More »

छत्रपती संभाजीनगरात २२ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये कुटुंबीयांची माफी मागितली

मुंबई | छत्रपती संभाजीनगरातील अविष्कार कॉलनीत २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृतक तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार असे असून ती फार्मास्युटिकल सायन्सची विद्यार्थिनी होती. काही महिन्यांपूर्वीच तिने वाळूज औद्योगिक परिसरातील एका औषध कंपनीत नोकरी सुरू केली होती. आई-भावाला लिहिली सुसाइड नोट मृत्यूपूर्वी निकिताने आई व भावाला उद्देशून सुसाइड नोट लिहली आहे. “मम्मी, भाऊ, दादा-दादी मला माफ करा. बाबा देखील मला सोडून गेले, मी आता जगून थकले आहे” असे भावनिक उद्गार तिने नोंदवले. आपल्या भावाला आईची काळजी घेण्याची विनंतीही तिने केली आहे. जेवणासाठी बोलावलं पण उत्तर मिळालं नाही राहुरी तालुक्यातील मूळची असलेली निकिता दोन मैत्रिणींसोबत अविष्कार कॉलनीत राहात होती. रविवारी तिच्या सहेल्या गावाला गेल्याने ती एकटी होती. रात्री दहा वाजता मित्रांनी तिला जेवणासाठी बोलावले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. निकिताच्या सुसाइड नोटमध्ये मृत्यूचं नेमकं कारण नमूद नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरात २२ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये कुटुंबीयांची माफी मागितली Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरव

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मराठी पत्रकार संघाकडून ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईत आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. राज्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणारा हा पुरस्कार राज्यातील कार्यक्षमता, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन प्रदान केला जातो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरव Read More »

कुडाळ नगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांचं भाजपमधून निलंबनसिंधुदुर्गातील राजकारणात खळबळ; शिस्तभंगाच्या आरोपांमुळे कारवाई

कुडाळ (Sindhudurg Politics): सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या अंतर्गत मोठा धक्का बसला आहे. कुडाळ नगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. निलंबनाचे कारण भाजपकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवर शिस्तभंगाचे गंभीर आरोप आहेत. पक्षविरोधी कार्य केल्यामुळे आणि वारंवार इशारे दिल्यानंतरही सुधारणा न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील पावलं निलंबित नगरसेवकांविषयीचा अहवाल राज्य नेतृत्वाकडे पाठवण्यात आला असून, या प्रकरणावर पुढील निर्णय भाजप प्रदेश नेतृत्व घेणार आहे. स्थानिक पातळीवर ही कारवाई होताच, आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू आहे. स्थानिक राजकारणात खळबळ कुडाळ नगरपरिषदेत भाजपचं वर्चस्व टिकवण्यासाठी पक्ष सातत्याने प्रयत्न करत असताना, या निलंबनामुळे विरोधकांना मोठं शस्त्र मिळालं आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी या कारवाईवर जोरदार प्रतिक्रिया दिली असून, “भाजपमध्ये गोंधळ आणि फुट पडते आहे” असा आरोप त्यांनी केला आहे. Quote “भाजप पक्षात शिस्त सर्वांत महत्त्वाची आहे. कुणीही पक्षविरोधी कार्य केलं, तर त्यावर कडक कारवाई होईल.”– भाजप जिल्हा नेतृत्व

कुडाळ नगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांचं भाजपमधून निलंबनसिंधुदुर्गातील राजकारणात खळबळ; शिस्तभंगाच्या आरोपांमुळे कारवाई Read More »

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत गैरव्यवहार उघड – राज्यभरात 26.30 लाख महिलांची घराघरांतून पडताळणीअपात्र लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी अंगणवाडी सेविका तैनात; शहरी भागात अपूर्ण पत्त्यांमुळे पडताळणीला अडथळे

मुंबई – मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ (Majhi Ladki Bahin Yojana) योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहारानंतर राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. एकूण 26.30 लाख महिला लाभार्थ्यांची घराघरांत जाऊन पडताळणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कामाची जबाबदारी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे. काय आढळलं प्राथमिक तपासणीत? माहिती तंत्रज्ञान विभागाने केलेल्या प्राथमिक विश्लेषणात अनेक अनियमितता उघडकीस आल्या. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी नोंदणी केली वयोमर्यादेचे उल्लंघन काही पुरुषांनी खोट्या पद्धतीने लाभ घेतला या प्रकारांमुळे राज्य सरकारने व्यापक तपासणीचा निर्णय घेतला आहे. पडताळणीत मोठ्या अडचणी पडताळणी मोहिमेत सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, विशेषतः शहरी भागात. सरकारकडून मिळालेल्या यादीत केवळ शहर आणि जिल्ह्याचे नाव असून, संपूर्ण पत्ते नाहीत अनेक पत्त्यांवर घरमालक उपलब्ध नाहीत काही पत्ते चुकीचे निघत आहेत या कारणामुळे पडताळणीची प्रक्रिया विलंबात अडकली असून, दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही काम अपूर्ण आहे. तपासणीचे मुख्य निकष विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, पडताळणी पुढील महत्त्वाच्या निकषांवर केली जात आहे: लाभार्थीचे वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असणे आवश्यक एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिलांना लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का याची चौकशी लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी नाही ना याची खात्री पडताळणी पथके प्रत्येक घरात जाऊन वैवाहिक स्थिती, रोजगार तपशील आणि कुटुंब रचनेची माहिती गोळा करत आहेत. आढळत आहेत नियमबाह्य गोष्टी या पडताळणीतून आतापर्यंत अनेक नियमबाह्य प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे खऱ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा फायदा पोहोचवण्याची प्रक्रिया अधिक काटेकोर केली जात आहे.

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत गैरव्यवहार उघड – राज्यभरात 26.30 लाख महिलांची घराघरांतून पडताळणीअपात्र लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी अंगणवाडी सेविका तैनात; शहरी भागात अपूर्ण पत्त्यांमुळे पडताळणीला अडथळे Read More »

Rohit Pawar News: देवेंद्र फडणवीसांच्या ‘देवाभाऊ’ जाहिरातीवरून रोहित पवारांचा टोला”सरकारकडे योजना बंद करण्याइतके पैसे नाहीत, मग कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या?” – रोहित पवार

मुंबई | गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देवाभाऊ’ शीर्षकाची जाहिरात झळकली. काही ठिकाणी फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी पुष्प अर्पण करताना दिसत होते, तर काही ठिकाणी ते गणपती बाप्पाला वंदन करताना दाखवले गेले. या जाहिरातींवर प्रकाशकाचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि सरकारवर जोरदार टीका केली. नेमकं काय म्हणाले रोहित पवार? “तुम्ही 40 कोटी, 400 कोटी किंवा 4000 कोटींच्या जाहिराती दिल्या तरी आम्हाला हरकत नाही. पण या निनावी जाहिराती नेमक्या का दिल्या गेल्या? याबाबत आमचा आक्षेप आहे,” असे रोहित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, “जर या जाहिराती सरकारने दिल्या असतील, तर एका बाजूला पैसे नसल्याचे कारण देऊन योजना बंद केल्या जात आहेत, कंत्राटदारांची बिले प्रलंबित आहेत आणि काहीजण आत्महत्या करत आहेत. अशा वेळी कोट्यवधींच्या जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?” “90 कोटींचा दंड माफ केलेल्या कंपनीने जाहिरात दिली का?” रोहित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “भाजपने जाहिरात दिली असेल तर नावाने का दिली नाही? नाही दिली, तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षातील अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून दिली का? उदाहरण द्यायचं झालं तर, ज्या कंपनीचा 90 कोटी रुपयांचा दंड महसूलमंत्री म्हणून तुम्ही माफ केला होता, त्या कंपनीने या जाहिराती दिल्या का?” याशिवाय, “जर या जाहिरातींमध्ये काहीही काळेबेरं नसेल, तर एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून जाहिराती कुणी दिल्या हे जाहीर करा,” असे आव्हानही पवारांनी दिले.

Rohit Pawar News: देवेंद्र फडणवीसांच्या ‘देवाभाऊ’ जाहिरातीवरून रोहित पवारांचा टोला”सरकारकडे योजना बंद करण्याइतके पैसे नाहीत, मग कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या?” – रोहित पवार Read More »

बीड शहर पहिल्यांदाच रेल्वे नकाशावर; १७ सप्टेंबरला धावणार पहिली रेल्वेमराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ऐतिहासिक क्षण; उपमुख्यमंत्री अजित पवार करतील उद्घाटन

बीड – बीडकरांचे दशकांपासूनचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. बीड–अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून, येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पहिल्यांदाच रेल्वे बीड जिल्ह्यातून धावणार आहे. या निमित्तानं बीड शहर प्रथमच रेल्वेच्या नकाशावर झळकणार असून, जिल्ह्याच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे. रेल्वेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. उद्घाटनाच्या तयारीसाठी बीड रेल्वे स्टेशनवर कामाला वेग आला असून, प्लॅटफॉर्मपासून विद्युतीकरणापर्यंत सर्व कामं अंतिम टप्प्यात आहेत. बीडकरांचं स्वप्न अखेर साकार गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात रेल्वेची मागणी होत होती. शहरात रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवास, व्यापार आणि उद्योगक्षेत्रावर त्याचा परिणाम होत होता. आता या मार्गामुळे बीडकरांना थेट रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. उद्घाटनाची उत्सुकता शिगेला बीड शहरात उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे. स्थानिक पातळीवर रेल्वे धावणार या ऐतिहासिक क्षणाचं स्वागत करण्यासाठी नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटना सज्ज होत आहेत. “बीड जिल्ह्यासाठी १७ सप्टेंबर हा केवळ मराठवाडा मुक्ती संग्राम दिन राहणार नाही, तर बीडकरांच्या आयुष्यात रेल्वेचं नवं पर्व सुरू होणार आहे. दशकानुदशकांचं स्वप्न अखेर पूर्ण होतंय,” असं स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं.

बीड शहर पहिल्यांदाच रेल्वे नकाशावर; १७ सप्टेंबरला धावणार पहिली रेल्वेमराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ऐतिहासिक क्षण; उपमुख्यमंत्री अजित पवार करतील उद्घाटन Read More »

दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धवांसोबत राज ठाकरे येण्याची शक्यता“मुंबईत मराठी माणूस टिकवण्यासाठी उद्धव-राज यांचे मिलन गरजेचे” – सचिन अहिर

मुंबई – येत्या दसरा मेळाव्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले आहेत. यंदाच्या शिवतीर्थावरील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे हेदेखील स्टेजवर दिसू शकतात. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण इशारा दिला. “दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते,” असे सचिन अहिर म्हणाले. “दसरा मेळावा – न भूतो न भविष्यती” सचिन अहिर यांनी एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत सांगितले – “उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे ही फक्त दोन पक्षांची गरज नाही, तर राज्यासाठी आवश्यक आहे. दसऱ्याला कार्यकर्त्यांना दिशा देण्याचं काम होतं. यावेळचा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ स्वरुपाचा असेल.” त्यांनी पुढे सांगितले की, राज आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांकडे कायम पाहत असतात. दोघं स्टेजवर एकत्र दिसतील का, हे सांगता येणार नाही. मात्र त्यांना आमंत्रित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महानगरपालिकेची लढाई आणि मराठी माणसाचा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा उल्लेख करताना सचिन अहिर म्हणाले – “मुंबईची भौगोलिक परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असेल. मी काँग्रेस-राष्ट्रवादीत 15 वर्ष होतो, पण महानगरपालिका उत्तम चालवू शकणारा पक्ष फक्त शिवसेना आहे, असं आम्हाला नेहमी वाटलं.” त्यांनी पुढे भर दिला – “मुंबईत मराठी माणूस टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र नेतृत्व करणे ही काळाची गरज आहे.”

दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धवांसोबत राज ठाकरे येण्याची शक्यता“मुंबईत मराठी माणूस टिकवण्यासाठी उद्धव-राज यांचे मिलन गरजेचे” – सचिन अहिर Read More »

बारामतीत ओबीसींचं ठिय्या आंदोलन; मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी“फडणवीसांना पुरंदरमध्ये घेराव घालणार” – ओबीसी समाजाचा इशारा

बारामती – बारामतीत काल ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा पार पडल्यानंतर आज त्याच ठिकाणी ओबीसी समाजाकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जर प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुरंदरमध्ये घेराव घालून जाब विचारला जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. जरांगे यांच्या वक्तव्याविरोधात संताप मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणादरम्यान धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांचे कार्यकर्ते देखील अपमानास्पद वक्तव्य करत असल्याचं सांगितलं जातं. “मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचे व्हिडिओ आम्ही प्रशासनाला दिले आहेत. तरीदेखील कारवाई होत नाही. 1 तारखेपासून आम्ही मागणी करत आहोत, 5 तारखेला भव्य मोर्चा काढला. पण सरकार गुन्हा दाखल करत नाही. नेमका कोणत्या दबावामुळे हा विलंब होतोय, हे समजत नाही,” असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. पुरंदरमध्ये फडणवीसांना जाब विचारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उमाजी नाईक जयंतीनिमित्त पुरंदरला येणार आहेत. त्यावेळी त्यांना जाब विचारण्याची तयारी ओबीसी समाजाने केली आहे. “तुम्ही आमच्या राजाजवळ नतमस्तक होता, पण दुसरीकडे आमच्यावर अन्याय होत आहे. आमचं सरकार असतानाही मनोज जरांगे यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना थेट विचारणार आहोत,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. बारामती व परिसरात ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येत असून, आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते.

बारामतीत ओबीसींचं ठिय्या आंदोलन; मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी“फडणवीसांना पुरंदरमध्ये घेराव घालणार” – ओबीसी समाजाचा इशारा Read More »

मराठा आरक्षणानंतर भाजपची ‘देवाभाऊ’ बॅनरबाजी; शिंदेंची प्रतिक्रियामुंबई-ठाण्यात फडणवीसांचे पोस्टर झळकले; “श्रेयवादाच्या लढाईत नाही” – मुख्यमंत्री

मुंबई/ठाणे – राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा पुढे करण्याची मोहीम सुरू झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात ‘देवाभाऊ’ असा उल्लेख असलेले बॅनर झळकले आहेत. त्याचबरोबर प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरही अशाच जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. सरकारने मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत जीआर काढले होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपसमितीने घेतलेल्या निर्णयानंतर जरांगे यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. यानंतर लगेचच भाजपकडून ‘देवाभाऊ’ मोहिम पुढे आल्याचं स्पष्ट होत आहे. या बॅनरवर “कोणीही निंदा करो, कितीही टीका करो, तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस एकच – देवेंद्रजी फडणवीस” असं लिहिलं आहे. तसेच “छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार, ना जातीचा, ना पातीचा, ना भाषेचा – देवाभाऊ” असाही मजकूर देण्यात आला आहे. मात्र हे पोस्टर नेमके कुणी लावले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीदेखील ही बॅनरबाजी भाजपकडूनच राबवली गेल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं – “श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही. मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकारने एकत्रितपणे केलं आहे. देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून पुढे काम करणार आहोत. सर्वसामान्यांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.” राजकीय वर्तुळात या हालचालींना आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्व दिलं जात आहे.

मराठा आरक्षणानंतर भाजपची ‘देवाभाऊ’ बॅनरबाजी; शिंदेंची प्रतिक्रियामुंबई-ठाण्यात फडणवीसांचे पोस्टर झळकले; “श्रेयवादाच्या लढाईत नाही” – मुख्यमंत्री Read More »