konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • रोहा शहरात डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचे लोकार्पण – उपमुख्यमंत्री अजित पवार, सयाजी शिंदे व भरत जाधव यांच्या शुभहस्ते
Image

रोहा शहरात डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचे लोकार्पण – उपमुख्यमंत्री अजित पवार, सयाजी शिंदे व भरत जाधव यांच्या शुभहस्ते

रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेते सयाजी शिंदे व भरत जाधव यांच्या शुभहस्ते पार पडल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.

नागरिक, कलारसिक, कलाकार आणि मान्यवरांनी या लोकार्पणाला हजेरी लावून नाट्यगृहासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज नाट्यगृहात

  • आरामदायी आसनव्यवस्था
  • उत्कृष्ट ध्वनी व प्रकाशयोजना
  • प्रशस्त व वातानुकूलित सभागृह
  • पार्किंग, कँटीन, प्रतीक्षालय

रोहा व परिसरातील कलारसिक व कलाकारांसाठी हे नाट्यगृह हक्काचं व्यासपीठ ठरणार असून, राज्यभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी हे महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे.

लोकार्पण सोहळ्यानिमित्त ‘मोरूची मावशी’ या नाटकाचा विशेष प्रयोग रंगमंचावर सादर झाला. कलावंतांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

नाटक, संगीत, नृत्य, व्याख्याने, कार्यशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम अशा विविध उपक्रमांमुळे या नाट्यगृहामुळं कला-संस्कृतीला नवा उत्साह व आयाम मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

Releated Posts

गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून तब्बल ५ लाख…

ByByसितम्बर 18, 2025

हे पुरुषा, बरं झालं तुला मोठे स्तन नाहीत!

लेखीका : लक्ष्मी यादव समाजातील स्त्री-पुरुषांवरील दुहेरी निकष, शरीरावरून होणारी थट्टा आणि महिलांना सहन करावा लागणारा मानसिक त्रास यावर…

ByByसितम्बर 18, 2025

कान्ह्याची गवळण

गाई मोकळ्या चरती गोकुळाच्या अंगणी,कान्हा वंशी वाजवी रंगेल मोकळ्या राणी. गोपिकांच्या हाकेवर दुधाचा दरवळतो सुवास,लहानशा हातांनी कान्हा करी…

ByByसितम्बर 15, 2025

दाण्यांतलं सुख, दागिन्यांतलं शून्य

संपत्ती असो वा दारिद्र्य – खरा ठेवा म्हणजे माणुसकी. धन नाही तरही जीवन सुंदर होतं, जर हृदय समृद्ध…

ByByसितम्बर 15, 2025
Image Not Found
Image Not Found

Gallery

H-1B व्हिसा फी वाढ: ट्रम्प यांचा राष्ट्रवादी मुखवटा आणि भारतासाठीचा कठोर इशारा
H-1B व्हिसा शुल्क वाढ: अमेरिकेचा निर्णय आणि भारतावरील परिणाम
ट्रम्प प्रशासनाचे धडक निर्णय — H-1B वीजावर $100,000 वार्षिक शुल्क; भारतासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात धक्का
जगदीप छोकर – लोकशाहीचा एक जागरूक प्रहरी
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचा आदर्श निर्णय – स्वतःची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल!
दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय: अडाणीविरोधातील गॅग ऑर्डर रद्द, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यास दिलासा
गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न
हे पुरुषा, बरं झालं तुला मोठे स्तन नाहीत!
आशिया कप भारत–पाक सामना : राज ठाकरेचं व्यंगचित्र आणि संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल