konkandhara.com

  • Home
  • राजकारण
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं
Image

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं

शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ‘अर्धे पाकिस्तानी’ अशी जहरी टीका केली होती. राऊतांच्या या वक्तव्यावरून राज्यात मोठी खळबळ उडाली असून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे.

मिटकरी यांनी अत्यंत संतप्त भाषेत राऊतांवर घणाघाती हल्ला चढवत म्हटलं की, “संजय राऊतांचा बापच दाऊद इब्राहिम असल्याने ते अशी भाषा वापरतात. अजित पवारांवर बोलायची राऊतांची लायकीच नाही. त्यांच्या जीभेला हासडले पाहिजे.”

👉 नेमकं काय म्हणाले राऊत?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळण्याला विरोध करताना राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. “अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त आहे, ते अर्धे पाकिस्तानी आहेत. जर महाराष्ट्रातील एका मंत्र्यांची ही भाषा असेल, तर ती राष्ट्रभक्त नागरिकाची नाही,” असे ते म्हणाले होते.

👉 अजित पवारांचं स्पष्टीकरण
खेळाकडे खेळाच्या नजरेतून पाहणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं. तसेच, विरोधक फक्त सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी मुद्दाम भावनिक विषयांचा वापर करतात, अशी टीकाही त्यांनी केली होती.

Releated Posts

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, राष्ट्रवादीचा पाठिंबा निर्णायक

पाली (10 सप्टेंबर) – अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता विजयी झाले…

ByBycare.eviano@gmail.comसितम्बर 13, 2025

म्हसळा नगराध्यक्षपदी फरीन बशारत, उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे – अधिकृत घोषणा

म्हसळा : म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी नगराध्यक्षपदी…

ByBycare.eviano@gmail.comसितम्बर 13, 2025

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे.…

ByBycare.eviano@gmail.comसितम्बर 13, 2025

रत्नागिरीत बांबू परिषद आणि शेतकरी मेळावा; १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प

रत्नागिरी | आज रत्नागिरीतील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात बांबू परिषद व शेतकरी मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला…

ByBycare.eviano@gmail.comसितम्बर 11, 2025
Image Not Found
Image Not Found

Gallery

H-1B व्हिसा फी वाढ: ट्रम्प यांचा राष्ट्रवादी मुखवटा आणि भारतासाठीचा कठोर इशारा
H-1B व्हिसा शुल्क वाढ: अमेरिकेचा निर्णय आणि भारतावरील परिणाम
ट्रम्प प्रशासनाचे धडक निर्णय — H-1B वीजावर $100,000 वार्षिक शुल्क; भारतासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात धक्का
जगदीप छोकर – लोकशाहीचा एक जागरूक प्रहरी
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचा आदर्श निर्णय – स्वतःची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल!
दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय: अडाणीविरोधातील गॅग ऑर्डर रद्द, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यास दिलासा
गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न
हे पुरुषा, बरं झालं तुला मोठे स्तन नाहीत!
आशिया कप भारत–पाक सामना : राज ठाकरेचं व्यंगचित्र आणि संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल