वॉशिंगटन | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या उपस्थितीत झालेल्या एका खास डिनर पार्टीत मोठा गोंधळ उडाला. ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट आणि फेडरल हाऊसिंग फायनान्स एजन्सी (FHFA) चे डायरेक्टर बिल पल्टे यांच्यातील जुना वाद एवढा चिघळला की, थेट हातघाईवर येण्याची वेळ आली.
कसा उफाळला वाद?
सीएनएनच्या माहितीनुसार, बेसेंट यांनी पल्टेवर आरोप केला की ते ट्रंपकडे त्यांच्या विरोधात वैयक्तिक तक्रारी करत आहेत. यावरून दोघांमध्ये वाद रंगला आणि बेसेंट यांनी पल्टेला शिवीगाळ केली. एवढंच नाही तर त्यांनी धमकी दिली –
“किंवा तो इथून निघून जावं, नाहीतर मी बाहेर पडतो. बाहेर चल, नाहीतर तोंडावर मुक्का मारेन.”
ही झटापट 3 ऑगस्ट 2025 रोजी वॉशिंगटन डीसीमधील एका खास क्लबमध्ये झाली. परिस्थिती ताणली गेली तेव्हा क्लबचे को-फाउंडर पुढे आले आणि दोन्ही अधिकाऱ्यांना शांत केलं.
जुनी वैरभावना
हा वाद अचानक उफाळलेला नसून त्यामागे अनेक महिन्यांपासून चालत आलेला सत्ता संघर्ष आहे.
बेसेंट, पल्टे आणि कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुटनिक यांच्यातील गटबाजी सर्वपरिचित आहे.
लुटनिक पल्टेचे जवळचे मानले जातात.
अलीकडेच ट्रंप यांनी सार्वजनिक कार्यक्रमात बेसेंट आणि लुटनिक दोघांची स्तुती केली होती, पण त्यांच्यातील अंतर (political gap) सर्वांनाच माहिती आहे.
पल्टेचा कद वाढत चालला
गेल्या काही आठवड्यांत पल्टेचे ट्रंप प्रशासनात वजन वाढले आहे. कारण, त्यांनी फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर लिसा कुक यांच्यावर मॉर्गेज फ्रॉडचा आरोप केला होता. या आरोपांनंतर ट्रंप यांनी कुक यांना पदावरून हटवलं. त्यानंतर कुक यांनी प्रशासनाविरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे.
यामुळे पल्टेचं महत्त्व ट्रंपजवळ आणखीन वाढलं, आणि याच पार्श्वभूमीवर बेसेंट–पल्टे वाद पुन्हा पेटल्याचं मानलं जात आहे.
बेसेंटचे आधीचे वाद
हे पहिल्यांदाच नाही. स्कॉट बेसेंट यांचा स्वभाव आक्रमक असल्याचं मानलं जातं.
यापूर्वी त्यांनी व्हाईट हाऊसचे माजी सल्लागार एलन मस्क यांच्यासोबतही आयआरएस प्रमुखाच्या नियुक्तीवरून तीव्र वाद घातला होता.
रविवारी ते ट्रंपसोबत US Open मध्ये दिसले, पण त्यांना ट्रंपपासून काही सीट्स दूर बसवण्यात आलं होतं.