गणेशोत्सवानिमित्त मुंबई, पुणे, गुजरात अशा ठिकाणांहून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. आता दीड दिवस व पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन पार पडल्यामुळे परतीच्या प्रवासाची वेळ जवळ आली आहे. वाढत्या गर्दीला तोंड देण्यासाठी महाड आगार प्रशासनाने यंदाही विशेष तयारी केली आहे.
🟠 १०० जादा बसेस सज्ज
महाड आगार प्रमुख रितेश फुलपगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परतीच्या प्रवासासाठी १०० जादा एस.टी. बस धावणार आहेत. फक्त महाड–पनवेल मार्गावरच ५० ते ६० बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय मुंबई, पनवेल, नालासोपारा, परळ, ठाणे, बोरिवली, उरण, कल्याण, पुणे आदी ठिकाणांवर प्रवाशांसाठी थेट गाड्या सोडण्यात येणार आहेत.
🟠 प्रवाशांसाठी सुविधा
- महाड आगार परिसरात तात्पुरते प्रवासी वाहतूक केंद्र उभारण्यात आले आहे.
- येथे बुकींगनंतर बस सुटतील.
- ग्रुप बुकींगची विशेष सुविधा असून अशा गट प्रवाशांसाठी एस.टी. बस थेट त्यांच्या गावातून सोडली जाणार आहे.
- नुकतेच आगारात नवीन स्वच्छतागृह व शौचालय सुरू करण्यात आले असून प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा वाढवण्यात आल्या आहेत.
🟠 ग्रामीण फेर्यांवर परिणाम
मोठ्या प्रमाणात जादा गाड्या व चालक गुंतल्यामुळे ग्रामीण भागातील फेर्यांवर थोडा फरक पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी ग्रामीण प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
🟠 संपर्क क्रमांक
- प्रवाशांनी बुकींग किंवा सोयीसाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:
- रितेश फुलपगारे (आगार प्रमुख) – ७७२१०२९९३९
- अमोल खाडे (सहाय्यक वाहतूक निरीक्षक) – ८७९३४६४७०२
- उदय हाटे (स्थानक प्रमुख) – ९०२१०८४८९३
- तुषार हाटे (निरीक्षक) – ७०५८७१६९१०
- डावरे (कार्यशाळा प्रमुख) – ९४२३३८०५६८
- चिनके (लिपिक) – ७७७००९९९३४