konkandhara.com

  • Home
  • Uncategorized
  • सिंधुदुर्गात भाजप मंत्री नितेश राणे यांची थेट मटका बुकीवर धाड; 11 जण ताब्यात
Image

सिंधुदुर्गात भाजप मंत्री नितेश राणे यांची थेट मटका बुकीवर धाड; 11 जण ताब्यात

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी आज थेट मटका बुकीवर छापा टाकत मोठी कारवाई केली. कणकवली शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या महादेव रमाकांत घेवारी यांच्या मटका अड्ड्यावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी ही धाड घातली.

🟠 घटनास्थळीच थेट धाड

या अड्ड्यावर अचानक पोहोचल्यावर काही जण पैसे आणि चिठ्ठ्यांसह आढळले. मंत्री राणे यांनी स्वतः चौकशी केली आणि तत्काळ कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना फोन करून कारवाईसाठी घटनास्थळी बोलावले.

🟠 पोलिसांचा तातडीचा सपाटा

यानंतर पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाली व ११ संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या छाप्यातून रोख रक्कम, लॅपटॉप, मटका पावत्या जप्त केल्या आहेत. या कारवाईनंतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये चांगलीच धांदड उडाल्याचे चित्र दिसत आहे.

🟠 चर्चेत नितेश राणे

गेल्या काही दिवसांत नितेश राणे यांनी राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्यातच आज स्वतः मटका अड्ड्यावर धाड घालून त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात आणि राजकीय वर्तुळात या घटनेची मोठी चर्चा सुरु आहे.

Releated Posts

मुंबई लोकल: सरकारचा ‘लक्झरी शो’ की लोकांसाठी खरंच दिलासा?

मुंबईच्या रेल्वे प्रवासाचं वास्तव म्हणजे — दररोज लाखो लोक गर्दीत कोंबले जातात, जीव धोक्यात घालून डब्यांमधून लटकतात, सुरक्षिततेचा…

ByByसितम्बर 5, 2025

महाडहून परतीच्या प्रवासासाठी १०० जादा एस.टी. बस; पनवेल मार्गावर ६० बसेस सज्ज

गणेशोत्सवानिमित्त मुंबई, पुणे, गुजरात अशा ठिकाणांहून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. आता दीड दिवस व पाच…

ByByअगस्त 21, 2025

‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक

कोकणात कामानिमित्त बाहेरगावी जाऊन पुन्हा गावी परतणाऱ्या नागरिकांना दीर्घकाळापासून ‘चाकरमानी’ म्हणून संबोधले जाते. मात्र हा शब्द आता कालबाह्य…

ByByअगस्त 21, 2025

फॅक्ट चेक | ने भारताने ‘ऑपरेशन सिंडूर’मध्ये 6 जेट्स आणि 250 सैनिक गमावले — सेनाध्यक्षांनी केला दावा? व्हायरल व्हिडीओ खोटा आहे

सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या व्हिडीओमध्ये भारताचे सेनाध्यक्ष जनरल उपेन्द्र द्विवेदी ‘ऑपरेशन सिंडूर’मध्ये 6 लढाऊ विमानं आणि 250 सैनिक…

ByByअगस्त 14, 2025
Image Not Found
Image Not Found

Gallery

H-1B व्हिसा फी वाढ: ट्रम्प यांचा राष्ट्रवादी मुखवटा आणि भारतासाठीचा कठोर इशारा
H-1B व्हिसा शुल्क वाढ: अमेरिकेचा निर्णय आणि भारतावरील परिणाम
ट्रम्प प्रशासनाचे धडक निर्णय — H-1B वीजावर $100,000 वार्षिक शुल्क; भारतासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात धक्का
जगदीप छोकर – लोकशाहीचा एक जागरूक प्रहरी
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचा आदर्श निर्णय – स्वतःची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल!
दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय: अडाणीविरोधातील गॅग ऑर्डर रद्द, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यास दिलासा
गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न
हे पुरुषा, बरं झालं तुला मोठे स्तन नाहीत!
आशिया कप भारत–पाक सामना : राज ठाकरेचं व्यंगचित्र आणि संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल